---Advertisement---

बदललेल्या जीवनशैली मुळेच स्त्री व पुरुषांच्या आयुष्यात वंध्यत्व : डॉ. मीनल चिडगुपकर

By team
On: September 27, 2024 10:27 AM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : प्रतिनिधी

आजकालच्या दगदगीच्या जीवनात व बदललेल्या जीवनशैली मुळेच स्त्री व पुरुषांच्या आयुष्यात वंध्यत्व हे मोठे आव्हान उभे राहिले आहे. करीअर व उशिरा होणारे विवाह तसेच फास्ट फूड व जंक फूड मुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम यामुळेही बरेच समस्या वाढले असल्याचे मनोगत स्त्री रोग तज्ञ डॉ. मीनल चिडगुपकर यांनी केल्या .

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्था व आपोलो फर्टीलिटी सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने न्यासाच्या यात्री निवासातील हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात जेष्ठ स्त्रीरोग तज्ञ डॉ. मीनल चिडगुपकर यांनी बोलत होत्या. या कार्यक्रमासाठी अन्नछत्र मंडळाची खूप मोठी मदत मिळाली असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा अलकाताई भोसले, उपाध्यक्षा रत्नमाला मचाले आणि सचिवा अर्पिताराजे भोसले, न्यासाचे सचिव शामराव मोरे, अपोलो फर्टीलीटीचे व्यवस्थापन अधिकारी डॉ. कीर्ती कटारे तसेच सिनियर आयव्हीएफ कन्सल्टंट डॉ. मीनल चिडगुपकर यांच्या हस्ते श्रींची व धन्वंतरीचे प्रतीमा पूजन करून शिबिराला सुरुवात करण्यात आला.

पुढे बोलताना डॉ. मीनल चीडगुपकर यांनी म्हणाल्या कि, अपोलो फर्टिलिटीमध्ये अतिशय अद्ययावत सोयींनी युक्त अशी सर्व सामान्य लोकांनाही परवडेल अशा माफक दरात IVF ची सोय उपलब्ध करून दिली असून, गराजूनी याचा लाभ घ्यावी असे आवाहन त्यांनी केल्या.*

तसेच डॉ.कीर्ती कटारे यांनी अपोलोचा कार्याचा थोडक्यात आढावा सांगितला. यावेळी अपोलोची संपूर्ण टीम व हिरकणी महिला बहुद्देशीय संस्थेचे सर्व महिला तसेच लाभार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. अनेक लाभार्थी जोडप्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. कीर्ती कटारे यांनी केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!