अन्नछत्र मंडळात श्रद्धा, भक्ती आणि आदर भावनेचा त्रिवेणी संगम पहायला मिळाला !
केंद्रीय नागरी उड्डाण व सहकार राज्य मंत्री ना. मुरलीधर मोहोळ यांनी केले कौतुक
पुणे : प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अन्नछत्र मंडळात श्रद्धा, भक्ती आणि आदर भावनेचा त्रिवेणी संगम पहायला मिळाला, भोसले पिता-पुत्रांचे धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक या क्षेत्रात देखील न्यासाच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य घडत असल्याचे मनोगत केंद्रीय नागरी उड्डाण व सहकार राज्य मंत्री ना. मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.
ते पुणे येथील प्रसिद्ध भरत मित्र मंडळ यांच्या वतीने महाशिवरात्र उत्सव उदघाटन कार्यक्रम प्रसंगी ना. मुरलीधर मोहोळ हे बोलत होते. या प्रसंगी ना. मोहोळ यांनी भरत मित्र मंडळ पुणे यांच्या वतीने गेल्या ४७ वर्षापासून महाशिवरात्र उत्सव समिती ट्रस्ट चे अध्यक्ष बाळासाहेब दाभेकर यांच्याकडून उत्सवाच्या काळात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते ही बाब उल्लेखनीय असल्याचे सांगून शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी पुणे म.न.पा. माजी महापौर अंकुश काकडे, अखिल मंडई चे अण्णा थोरात, माजी नगरसेवक दत्ता सागरे, गायक अबू मलिक, अभिनेते प्रवीण तरडे, महाशिवरात्र उत्सव समिती ट्रस्ट चे अध्यक्ष बाळासाहेब दाभेकर, शिरीष मावळे (काका), बाळासाहेब देसाई-कुलकर्णी(बबलादकर), रोहित खोबरे, लाला राठोड, संतोष भोसले, स्वामीनाथ गुरव, मैनोद्दीन कोरबू, सरफराज शेख, गणेश भोसले, प्रशांत शिंदे, संतोष माने आदिजन उपस्थित होते.
आठवणींना उजाळा- केंद्रीय राज्य मंत्री पदाचे सूत्रे हाती घेतल्यानंतर श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी तीर्थ क्षेत्र अक्कलकोट येथे गेलो असता, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात अवर्जून महाप्रसाद घेण्यासाठी गेलो या प्रसंगी मंडळाकडून श्री स्वामी समर्थांच्या भक्तांकरिता महाप्रसादाची केलेली सोय पाहता धार्मिक क्षेत्रातील राज्यातील एकमेव ठिकाण श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ असून, संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अन्नछत्र हे धार्मिक क्षेत्रातील एक ध्यास पर्व आहे.
– ना. मुरलीधर मोहोळ
केंद्रीय नागरी उड्डाण व सहकार राज्य मंत्री