---Advertisement---

‘जय श्रीराम…’जयघोषात सोलापुरात मंगल कलश दाखल !

By team
On: November 30, 2023 9:49 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

अयोध्येत मंत्रोच्चाराने पूजन करून पवित्र केलेल्या अक्षतांचा मंगल कलश सोलापुरात दाखल झाला. विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांतातर्फे सोलापूर जिल्ह्याला हा मंगल कलश देण्यात आला. २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे श्रीराम मंदिरात प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी अयोध्यावरून आलेल्या या अक्षता संपूर्ण देशभरात घरोघरी जाऊन वाटण्याचे अभियान विश्व हिंदू परिषदेतर्फे राबविण्यात येणार आहे.

विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांतातर्फे मंगल अक्षता कलश विश्व हिंदू परिषदेच्या सोलापूर जिल्हा शाखेकडे सुपूर्द करण्यात आला. ‘जय श्रीराम…’ च्या जयघोषात मंगल अक्षता कलशाचे स्वागत झाले. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हामंत्री संजयकुमार जमादार, जिल्हा सहमंत्री अशोक पुजारी, रा.स्व. संघाचे पदाधिकारी विजयकुमार पिसे, मल्लिकार्जुन पाटील, अप्पू कुगणे, विश्व हिंदू परिषदेचे सोलापूर शहर अध्यक्ष जयदेव सुरवसे, सोलापूर शहर सहमंत्री रवी नामदास, बजरंग दलाचे सोलापूर शहर संयोजक नागेश बंडी आदी उपस्थित होते. घरोघरी जाऊन अक्षता वाटण्याचे अभियान आगामी काही दिवसात सुरू होणार असल्याचे विश्व हिंदू परिषदेकडून सांगण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!