नाशिक : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही महिन्यापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आता महाराष्ट्र दौऱ्यावर बाहेर पडले आहे. आज मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिक या बालेकिल्ल्यात त्यांची तोफ धडाडणार आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, कळवण, बागलाण, मालेगाव, नांदगाव येथे ते भेट देणार आहेत. यावेळी मराठा समाजाकडून ठिकठिकाणी त्यांचे जल्लोषात स्वागत केले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय जरांगे साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीचे दर्शनही घेणार आहेत.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. दोन्ही नेते एकमेकांवर टीका करत असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करत सरकराने काढलेल्या अध्यादेशाला देखील भुजबळ यांनी विरोध केला आहे. त्यातच आज जरांगे नाशिक दौऱ्यावर असल्याने त्यांच्या या दौऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे. 8 फेब्रुवारी 2024 : दादर मुंबईतून- नाशिक मार्गे- सटाणा मार्गे साल्हेर किल्ला येथे सकाळी 11 वाजता नियोजित कार्यक्रम. त्यानंतर सान्हेर किल्याहुन छत्रपती संभाजीनगर मार्गे- आंतरवाली सराटी.
9 फेब्रुवारी 2024 : आंतरवालीहून– भोगलगाव (जिल्हा-बीड) येथे सकाळी 10 वाजता नियोजित कार्यक्रमला उपस्थित राहणार. त्यानंतर भोगलगावहून – बीड मार्गे- कोळवाडी (मांजरसुबा घाट) येथे दुपारी 12 वाजता नियोजित कार्यक्रमला उपस्थित राहणार. त्यानंतर कोळवाडीहून बीड – गेवराई मार्गे – आंतरवाली सराटी. 10 फेब्रुवारी 2024 : आंतरवाली सराटी येथे सकाळी 10 वाजता महत्वाची बैठक व त्यानंतर मनोज जरांगे पाटिल यांचे आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला सुरुवात होणार आहे.