---Advertisement---

कॉंग्रेसला मोठा धक्का : बाबा सिद्धीकी यांचा राजीनामा

By team
On: February 8, 2024 3:36 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच भाजप कॉंग्रेसला मोठे धक्के देवू लागली आहे. नुकतेच काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांच्या पाठोपाठ बाबा सिद्धीकी यांनी काँग्रेसच्या पदाचा राजीनामा देत असल्याचे ट्विट केले आहे. ते राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी अखेर पक्षाचा राजीनामा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते अजित पवार गटात जाणार, अशी चर्चा होती. माझा काँग्रेसमधील आतापर्यंतचा प्रवास चांगला राहिला. या आठवणी कायम स्मरणात राहतील, अशी प्रतिक्रिया बाबा सिद्दीकी यांनी दिली. मिलिंद देवरा यांच्यानंतर काँग्रेसचा मुंबईतील आणखी एक नेता बाहेर पडल आहे.

बाबा सिद्दीकी यांचे नाव 2022 मध्ये राज्यसभेसाठी चर्चेत आले होते. त्यांना राजद राज्यसभेवर पाठवणार अशी चर्चा त्यावेळी सुरू होती. मात्र तसे झाले नाही. आता ते अजित पवार यांच्यासोबत जाणार असून त्यांना अजित पवार राज्यसभेवर पाठवू शकतात अशी चर्चा आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!