---Advertisement---

पतीच्या प्रचारासाठी शांभवी कल्याणशेट्टींनी घेतला पुढाकार

By team
On: November 10, 2024 11:31 AM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट वृत्तसंस्था 

 

भाजपा महायुतीचे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याणशेट्टी यांनी प्रचारात सहभाग घेतला आहे . शांभवी कल्याणशेट्टी यांनी ग्रामीण भागात जाऊन पती तथा  भाजपाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या मितभाषी स्वभावामुळे महिलावर्ग भाजपकडे वळताना दिसत आहे.

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा प्रचार सर्वत्र सुरू आहे. भाजपा व महायुतीच्या घटक पक्षाच्या पदाधिकारी नेते मंडळींकडून मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी हे ग्रामीण भागातील विविध गावात प्रचार सभा घेऊन जोर दिला आहे .

यात पदयात्रा, बैठका, कॉर्नर सभा यावर भर देण्यात येत आहे. पती तथा भाजपाचे  उमेदवार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रचारासाठी त्यांच्या पत्नी शांभवी कल्याणशेट्टी यांनी प्रचारात रोज वेग वेगळ्या भागात महिला वर्गाच्या बैठका घेत आहेत. शांभवी कल्याणशेट्टी यांनी मैंदर्गी शहरात प्रचार केला. तसेच विविध गावात जाऊन पदयात्रा काढून मतदारांशी प्रत्यक्ष भेट घेऊन संवाद साधत आहेत. शांभवी कल्याणसाठी या महिला मतदारांना भाजपाचे उमेदवार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. भाजपा उमेदवार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याणशेट्टी या प्रचारात सहभागी झाल्याने भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यात उत्साह संचारला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!