ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कमलाकर सोनकांबळे यांची आयटीआयच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी निवड

अक्कलकोट  : प्रतिनिधी

गोगांवचे उपसरपंच कमलाकर सोनकांबळे यांची श्री स्वामी समर्थ औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटी आय)येथे व्यवस्थापन समितीवर शासकीय सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
कमलाकर सोनकांबळे हे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे खंदे समर्थक असुन म.रा.मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष आहेत.सिद्धार्थ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून युवकांसाठी विविध रोजगार निर्मिती बाबत उपक्रम राबविले,सम्यक उद्योग समूहाच्या माध्यमातून युवकांना व्यवसाय करण्यासाठी शासकीय योजनेचे माहिती देण्याचे काम केले आहे.सामाजिक कार्य करत असताना युवकांनी व्यवसायाकडे वळले पाहिजे यासाठी ते सतत प्रयत्नशिल असतात. या सर्व कामाची दखल घेऊन अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेवर व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे

कमलाकर सोनकांबळे यांच्या निवडी बद्दल आ. सचिन कल्याणशेट्टी,नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, सागर कल्याणशेट्टी,संतोष गायकवाड,गोगावच्या लोकप्रिय सरपंच वनिता मधुकर सुरवसे,युवा उद्योजक मधुकर सुरवसे,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव अरोटे,प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाचे तालुकाध्यक्ष अविनाश मंडीखांबे,सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रदीप जगताप,एस एस शेळके प्रशाला व ज्युनियर कॉलेजचे चेअरमन बसवराज शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे, सोलापूर जिल्ह्यातील वरिष्ठ पत्रकार आणि सुयश मीडियाचे ब्युरो चिफ महेश गायकवाड यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.

अक्कलकोट तालुक्यातील ग्रामीण भागातील ज्या विद्यार्थ्यांना चांगले काम करता येतील ते सर्व कामे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली केले जातील.औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात नव्याने काय करता येईल याकडे लक्ष दिले जाईल व आपल्या तालुक्यातील जास्ती जास्त विद्यार्थी प्रशिक्षण घेऊन व्यवसाय करतील याकडे लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
कमलाकर सोनकांबळे -अध्यक्ष म.रा.पत्रकार संघ, उपसरपंच गोगाव, अक्कलकोट

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!