सोलापूर : वृत्तसंस्था
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त खा. शिंदे यांनी आंबेडकर चौकातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी खा. प्रणिती शिंदे यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे.
खा.प्रणिती शिंदे म्हणाले कि, भाजपची सत्ता आल्यापासून देशाची वाटचाल हिटलरशाहीकडे चालली आहे. भाजप संविधान बदलण्याचे षड्यंत्र करत आहे. मात्र, जोपर्यंत काँग्रेस आहे तोपर्यंत संविधान बदलू देणार नाही, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त खा. शिंदे यांनी आंबेडकर चौकातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. याप्रसंगी शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी महापौर संजय हेमगड्डी, सुशीला आबुटे, आरिफ शेख, प्रवीण निकाळजे, शिवा बाटलीवाला, विनोद भोसले, श्रीदेवी फुलारे, प्रमिला तुपलवंडे, मनोज यलगुलवार उपस्थित होते.
खा. शिंदे म्हणाल्या, भारतरत्न डॉ. आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून लोकशाही दिली. मात्र, भाजपला लोकशाही मान्य नाही. त्यांचे विचार डॉ. आंबेडकरांच्या विरोधात आहेत. नेहमीच संविधानाचा तिरस्कार करतात. चारसो पारचा नारा भाजपने संविधान बदलण्यासाठी दिला होता. मात्र, जनतेनी त्यांची जागा दाखवली आहे.