ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कुरनूर शाळेचे मुख्याध्यापक चंद्रशेखर पाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त शिक्षण विभागातर्फे सत्कार,३५ वर्षानंतर झाले सेवानिवृत्त

अक्कलकोट, दि.३१ : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक चंद्रशेखर पाटील हे ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज सेवानिवृत्त झाले.त्यानिमित्त पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे
आज त्यांचा या प्रदीर्घ सेवेबद्दल गौरव करण्यात आला.पंचायत समितीच्या सभापती सुनंदाताई
गायकवाड,माजी सभापती सिद्धार्थ गायकवाड,पंचायत समितीचे सदस्य राजकुमार बंदीछोडे,गुंडप्पा पोमाजी,
खय्युम पिरजादे,गटशिक्षणाधिकारी अशोक भांजे, बालविकास प्रकल्प अधिकारी बालाजी अल्लडवाड यांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा संपन्न झाला. चंद्रशेखर पाटील हे एक शिस्तप्रिय, संवेदनशील आणि मनमिळावू स्वभावाचे मुख्याध्यापक म्हणून ते चपळगाव विभागामध्ये परिचित आहेत. पहिल्यांदा बऱ्हाणपूर येथे २३ वर्ष, कुरनूर येथे शिक्षक म्हणून ३ वर्ष, त्यानंतर बागवाननगर येथे ८ वर्ष,तीर्थ येथे काही महिने, त्यानंतर डोंबरजवळगे येथे काही प्रमाणात सेवा झाली आहे. त्यानंतर पुन्हा कुरनूर येथे ६ वर्षापेक्षा अधिक काळ ते मुख्याध्यापक म्हणून सेवेत कार्यरत होते.
या काळामध्ये ई-लर्निंग, शालेय रंगरंगोटी, संगणक, संच प्रोजेक्टर, प्रिंटर इत्यादी गोष्टी १४ व्या वित्त आयोगातून मिळवण्यासाठी प्रयत्न केले. पाणी फिल्टर, गॅस, घसरगुंडी प्रयोग साहित्य, खेळ साहित्य प्राप्त करून शाळेचा लौकिक वाढवला. त्याशिवाय विविध उपक्रम म्हणून शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहल, वृक्ष रक्षाबंधन, ग्रंथदिंडी, ईद मुबारक, प्रत्येक दिवशी मुलांचे वाढदिवस साजरा करणे, जादूचे प्रयोग, स्नेहसंमेलन, कुंभारकाम शिकविणे, गुऱ्हाळ भेट ,शाळा ‘अ’ श्रेणीमध्ये आणली. तालुका खेळामध्ये घवघवीत यश त्यांनी शाळेला मिळवून दिले. शिवाजी प्रतिष्ठान मरवडे कडून आदर्श शाळा पुरस्कार ही त्यांच्या कारकिर्दीत मिळाला. आदर्श मुख्याध्यापक म्हणूनही त्यांचा अनेक वेळा गौरव झाला. त्यांच्या कारकिर्दीत कुरनूर शाळेचा गौरव वाढला.२०१८ मध्ये जिल्हा परिषदेकडून सावित्रीबाई फुले आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार देखील त्यांना मिळाला. प्रज्ञाशोध चौथीच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये शाळेला यश मिळवून दिले. तालुका कथाकथन, नृत्य, वक्तृत्व स्पर्धेत शाळेतील विद्यार्थी चमकले. त्याशिवाय गावात लोकवर्गणीतून वर्गणी जमा करून शाळेला रंगरंगोटी करणे
असो कि शाळेला झालेली कमान असेल त्याशिवाय सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या कामातही त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिलेले आहे. ते आज सेवानिवृत्त झाल्याने कुरनूर ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त होत आहे.
कुरनूर गावांमध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे सेवा बजावून विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम केले, अशा प्रकारची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.मी मूळचा चपळगावचा असल्याने कुरनूर आणि चपळगावचे नाते अतिशय जवळचे आहे.त्यामुळे यापुढेही शैक्षणिक सुविधा आणि गुणवत्तेच्या बाबतीत नेहमी माझे लक्ष गावाकडे राहील,असे त्यांनी निवृत्तीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे पुणे विभागीय अध्यक्ष दयानंद कवडे,प्राथमिक शिक्षक संघाचे वीरभद्र यादवाड,संघाचे राज्य संघटक विजयकुमार तडकलकर, कन्नड विभाग जिल्हाध्यक्ष बसवराज गुरव,दयानंद चव्हाण ,रेवणसिद्ध हत्तुरे,अशोक पोमाजी,सुरेश शटगार,धर्मराज बिराजदार,सदानंद पोतदार,सचिन पाटील आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!