---Advertisement---

लवंगी (ता.द सोलापूर) येथील पिडीत परिवाराची खा.जयसिध्देश्वर शिवाचार्य महाराज यांच्याकडून सात्वंन

Follow Us:
---Advertisement---

दक्षिण सोलापूर : लवंगी ता.दक्षिण सोलापूर येथील शनिवारी दुपारी एकाच कुटुंबातील चार अल्पवयीन मुले हि भिमा नदीच्या पात्रात बुडुन मृत्युमुखी पडली होती त्या पिडीत कुटुंबास आज खा.जयसिध्देश्वर शिवाचार्य महाराज यांनी भेट घेऊन त्यांचे सात्वंन केले.आणि त्यांना धीर दिला.

यावेळेस त्यांच्यासोबत सागर सिमेंटचे मालक समाजसेवक महादेव कोगनुरे, भाजपाचे तालुका सरचिटणीस यतीन शहा, तहसीलदार उज्वला सोरटे मॅडम,भाजपचे ज्येष्ठ नेते हणमंत कुलकर्णी सर, सरपंच संगमेश बगले, सोमनिंग कमळे,महेश बगले, गुरुनाथ कोट्टलगी, काशिम शेख, मंजुनाथ पुजारी, अण्णप्पा वागदरी, सुनिल पाटील, याच्यासह नागरिक उपस्थित होते.

शनिवार दुपारी लंवगी येथील एकाच कुटुंबातील चार मुले बुडुन मृत्युमुखी पडले होते.या परीवारास भेट देऊन त्यांचे सात्वंन करण्यासाठी खा.जयसिध्देश्वर शिवाचार्य महाराज हे आज लंवगी येथे आले होते.
खा.जयसिध्देश्वर शिवाचार्य महाराज म्हणाले की झालेली घटना हि फार दुखःद आणि वेदना देणारी आहे.शासनाकडुन यांना मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही खा यावेळी बोलताना म्हणाले.

यावेळेस खा.जयसिध्देश्वर महाराज यांच्याकडून पिडीत कुटुंबास प्रत्येकी अकरा अकरा हजार रूपये आणि यतीन शहा व महादेव कोगनुरे यांच्याकडून अकरा अकरा हजार रूपये या परीवारास मदत म्हणून देण्यात आली

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!