ध्यास विश्वसार्ह बातमीचा

लाडक्या बहिणींची लॉटरी लागणार, मुख्यमंत्र्यांची मोठी ग्वाही

नेवासा वृत्तसंस्था 

विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार सुरु असून नेवासा विधानसभा मतदारसंघात आयोजीत प्रचारसभेत आमचं सरकार देणारं आहे, घेणारं नाही. घेणारे देवालाही सोडत नाहीत, मालक तसे तर त्यांचे आमदार कसे? असा घणाघात मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.

आमचं सरकार देणारं आहे घेणारं नाही. घेणारे देवालाही सोडत नाहीत. मालक तसे तर त्यांचे आमदार कसे? लंघे तुम्ही आमदार झाल्यावर तुम्हाला जनतेचे प्रश्न सोडवायचे आहेत. नेवासा तालुका विकासाची चातकसारखी वाट बघतोय. त्यामुळे आपल्याला परिवर्तन करायचं आहे. यापूर्वीच्या आमदाराने शेतकरी आणि जनता सोडून स्वतःचा विकास केला. स्वतःचा केला तर म्हणा बस कर आणि आता घरी बस. मतदारसंघाचा विकास हवा असेल तर परिवर्तन तुम्हाला घडवावं लागेल. लंघेशिवाय तुम्हाला पर्याय नाही. शनीमंदिर हे पवित्र स्थान आहे, ही जनता देवस्थानमधील घोटाळा खपवून घेणार नाही. या ठिकाणी कोणी स्वतःचे घर भरत असेल तर शनीदेव या नेवासा मतदरसंघात परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाहीत, असा हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, लाडक्या बहिणींच्या खात्यात पाच हप्ते जमा झालेत. सरकार आल्यावर 1500 चे 2100 रुपये आम्ही लाडक्या बहिणींना देणार आहोत. विरोधकांनी महालक्ष्मी योजना काढली, मात्र या बहिणी विरोधकांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाहीत. आधी पाप केलं आणि आता म्हणता आम्ही देतो, तुम्ही काय देणार आमचं बहिणींना देऊन झालं. ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी आहे. आम्ही शेतकऱ्यांची कर्ज माफी करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या राज्यात कोणीही उपाशी झोपता कामा नये, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. दरम्यान दुसरीकडे विरोधकांनी लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर महालक्ष्मी योजनेचं अश्वासन दिलं आहे. सरकार आलं तर लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये देऊ असं महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात म्हटलं आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!