---Advertisement---

‘क्राईम पेट्रोल’ फेम अभिनेता नितीन चौहानचे निधन

By team
On: November 8, 2024 8:08 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई वृत्तसंस्था 

 

टीव्ही विश्वावर शोककळा पसरली आहे. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध टीव्ही अभिनेते नितीन चौहानचे आकस्मिक निधन झाले आहे. नितीनने वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. अभिनेत्याच्या निधनामुळे चाहतेही निराश झाले आहेत. नितीन ‘स्प्लिट्सविला ५’ आणि ‘क्राइम पेट्रोल’मध्येमहत्त्वपूर्ण कामगिरी करताना दिसला.

नितीन चौहान यांच्या निधनाची माहिती विभूती ठाकूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर पोस्टद्वारे दिली आहे. विभूती ठाकूरने तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्रीने नितीनबरोबरचा स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. पोस्ट शेअर करताना तिने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “रेस्ट इन पीस माय डिअर. ऐकून खूप आश्चर्य व दुःख झाले”. विभूती ठाकूर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, “देव तुमच्या आत्म्याला शांती देवो”. नितीन चौहानने ‘दादागिरी २’ हा रिॲलिटी शो जिंकून लोकांच्या हृदयात स्वत:साठी एक खास स्थान निर्माण केले.

नितीन चौहान हा यूपीच्या अलीगढ जिल्ह्यातील रहिवासी होता. त्याने MTV चा ‘Splitsvilla Season 5’ हा शोदेखील जिंकला. याशिवाय नितीन ‘क्राईम पेट्रोल’ आणि ‘फ्रेंड्स’ सारख्या मालिकांमध्येही दिसला होता. ‘जिंदगी डॉट कॉम’मध्येही नितीनने काम केलं. नितीन चौहानला ‘क्राईम पेट्रोल’मधून विशेष ओळख मिळाली. तो २०२२ मध्ये ‘तेरा यार हूं मैं’ या टीव्ही शोमध्ये दिसला होता.

अभिनेत्याचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र त्याने आत्महत्या केल्याचेही बोलले जात आहे. पोलीस सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत, मात्र अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही. नितीनने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नितीनचे वडील मुंबईत आले आहेत आणि अभिनेत्याचे पार्थिव अलिगढला घेऊन जाणार आहेत. मात्र, पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून अद्यापपर्यंत पोलीस किंवा कुटुंबीयांकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!