---Advertisement---

शिर्डी व सोलापूर लोकसभा मतदारसंघ रिपाईला सोडा

By team
On: January 20, 2024 4:05 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

शिर्डी व सोलापुर लोकसभा मतदारसंघ महायुतीचे घटक पक्ष म्हणून रिपाईला सोडावे,अशी मागणी अक्कलकोट रिपाईच्यावतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आले. शुक्रवारी, फडणवीस अक्कलकोट येथे आले असता कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन निवेदन दिले.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट हा महायुतीचा भाग असून महाराष्ट्र सह देश पातळीवर रिपब्लिकन पक्ष भाजपला मदत करत असून सोलापुर लोकसभा मतदारसंघ हा रिपब्लिकन पक्षचा बल्लेकिल्ला आहे आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती साठी राखीव असून रिपाई प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांना मानणारा सर्व जाती धर्माचा मोठा वर्ग आहे.

गेल्या पन्नास वर्षांपासून आंबेडकरी चळवळीचे मोठे काम त्यांच्या हातून घडत आहे महायुतीचे काळात महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून यशस्वीपणे अध्यक्षपद भूषविलेले आहे अहिल्याबाई होळकर सोलापुर विद्यापीठचे सिनेट सदस्य पदी ते गेले दोन टर्म सातत्याने निवडून येत आहेत त्यांना चळवळीचा प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे.

जिल्ह्याच्या अकरा तालुक्यात राजाभाऊ सरवदे याचे मोठे काम असून महायुतीला ही जागा राजाभाऊ सरवदे यांच्या रूपानी दिली तर जिंकण्यासाठी अतिशय सोईस्कर होईल आपण या सर्व बाबींचा विचार करून सोलापूर लोकसभा मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाला सोडण्यात यावे, अशी मागणी रिपाइंचे अक्कलकोट तालुकाध्यक्ष अविनाश मडिखांबे यांनी निवेदाद्वारे केली आहे.यावेळी भाजपचे सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा आमदार सचिन कल्याणशेट्टी,रिपाइं अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे, रिपाइं तालुका सरचिटणीस राजू भगळे, युवक तालुकाध्यक्ष अप्पा भालेराव, अंबादास गायकवाड,शुभम मडीखांबे ,सुरेश सोनकांबळे,आकाश मडीखांबे ,सुदर्शन कांबळे,राजु वाघमारे आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!