ध्यास विश्वसार्ह बातमीचा

माढा लोकसभा उमेदवाराची अफलातून घोषणा : तरूणांची लग्न करणं

सोलापूर : प्रतिनिधी

राज्यात दुष्काळ, बेरोजगारी, महागाई, हमीभाव या सारखे कळीचे आणि महत्त्वाचे अनेक प्रश्न समोर आहे. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने सर्व प्रश्नांना बगल देत, थेट लग्न न झालेल्या तरूणांची लग्न करणं हा माझा समोरचा महत्त्वाचा प्रश्न आहे. तो सोडविण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याची अफलातून घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.‌

वंचित बहुजन आघाडीकडून रमेश बारस्कर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे ते आज पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना मतदार संघातील लग्नाळू तरूणांच्या समस्येवर भाष्य केलं.

माढा लोकसभा मतदारसंघासह राज्यभरातील तरुणांची वेळेवर लग्न होत नाही. त्यांची ही आजही मोठी समस्या आहे. अनेकांची 35 – 40 वर्षे उलटून गेली आहेत. तरुणांची लग्न होत नाहीत. त्यांच्या लग्नाची ही समस्या सोडविण्यासाठी प्राधान्याने काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.दरम्यान, वंचित बहुजन आघाडीकडून माढा लोकसभा मतदारसंघासाठी रमेश बारसकर यांना उमेदवारी जाहीर झाली. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने हकालपट्टी केली आहे. त्यांनी महाविकास आघाडीकडे माढ्यातून उमेदवारीची मागणी केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!