---Advertisement---

मनोज जरांगेंची मोठी घोषणा ! तयारीला लागा..

By team
On: November 12, 2024 8:31 PM
Follow Us:
---Advertisement---

जालना वृत्तसंस्था

विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर राजकीय घडामोडी घडताय. मनोज जरांगे यांनी निवडणूक लढणार नसलो तरी काही नेत्यांना पाडणार असल्याचा इशाराही दिला आहे. त्यातच आता त्यांनी एक मोठं विधान केलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिला आहे. सामूहिक आमरण उपोषणाची तयारी सुरू करा, असं आवाहन जरांगेंनी मराठा समाजाला दिलं आहे. मनोज जरांगे जालनाच्या अंतरवाली सराटीत पुन्हा उपोषण सुरू करणार आहेत. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर तारीख जाहीर करणार आहे, तर हे भारतातलं सर्वात मोठं आमरण उपोषण असल्याचं जरांगेंनी सांगितलं आहे.

आपल्या गावागावात आमरण उपोषणासंबंधी बैठका सुरु करा. सरकार स्थापन झाल्यानंतर आपण तारीख जाहीर करणार आहोत. आजपासून मराठा समाजाने बैठका सुरु केल्या तरी चालेल. हा ऐतिहासिक लढा असून सर्वात मोठं उपोषण असेल असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.

मी समाजाच्या आरक्षणासाठी लढता लढता मरणार असं सांगत मनोज जरांगे यांनी सरकार कुणाचंही येवो त्यांच्यासमोर आमचं आव्हान असेल असं स्पष्ट केलं आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!