ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मनोज जरांगेंच्या विधानाने खळबळ.. ‘माझं शरीर मला..’

जालना वृत्तसंस्था 

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणारे नेते मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला भावनिक साद घातली आहे. मी आता थोड्या दिवसांचा पाहुणा आहे. माझं शरीर मला साथ देत नाही, अशी भाविनक साद मनोज जरांगे पाटलांनी घातली आहे. नाशिकच्या येवल्यात जरांगे पाटलांनी सभा घेऊन मराठा समाजाला भावनिक आवाहन केलं आहे.

मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला भावनिक साद घातलीय. मी आता थोड्या दिवसांचा पाहुणा आहे. माझं शरीर मला साथ देत नाही, असं मोठं विधान मनोज जरांगे पाटलांनी केलं आहे. माझी प्रकृती बरी नसून मला प्रचंड वेदना होत असल्याची कबुलीही जरांगे पाटलांनी दिली आहे. येवल्यात जरांगेंनी सभा घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

विधानसभा निवडणुकीतून जरांगे पाटलांनी माघार घेतली आणि निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं. उमेदवार उभे करणार नाही मात्र पाडणार असा इशारा जरांगे पाटलांनी दिला. त्यानंतर पुन्हा जरांगे पाटलांचा दौरा सुरू झाला आहे. मराठा आरक्षणावरून राज्यातलं वातावरण ढवळून काढणा-या जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा कंबर कसली आहे. त्यामुळे आता भावनिक साद घालून जरांगे पाटील वातावरण फिरवणार का हे पाहणं महत्वाचं आहे.

लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा मोठा फटका महायुतीला बसला होता. मराठवाड्यातील 8 पैकी केवळ 1 जागा मिळवण्यात महायुतीला यश आलं होतं. महायुतीविरोधात जरांगे पाटलांनी रान पेटवलं आणि त्याचा प्रभाव लोकसभेला दिसला. आता विधानसभा निवडणुकीतही जरांगे पाटलांनी उमेदवार पाडण्याचा इशारा दिला आहे. उपोषणाच्या माध्यमातून जरांगे पाटील आपला लढा लढत आहेत. सातत्यानं उपोषण केल्यामुळे प्रकृती ढासळल्याचं जरांगेंनी म्हटलं आहे. त्यातच आता भावनिक साद घालून जरांगे पाटलांनी आवाहन केलं आहे. त्यामुळे विधानसभेला जरांगे फॅक्टरचा कितपत प्रभाव पडणार हे पाहावं लागणा आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!