---Advertisement---

कल्याणशेट्टी यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी अमित शहा यांची जाहीर सभा

By team
On: November 13, 2024 8:37 AM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रचारार्थ शुक्रवार दि.१५ नोव्हेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेला जिल्ह्यातील भाजप व महायुतीचे प्रमुख नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत.या सभेसाठी भाजप व महायुतीकडून जोरदार तयारी सुरू असून ही सभा बॅगेहळळी रोडच्या पटांगणात होणार आहे.

या सभेला किमान १५ ते २० हजार भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत,अशी माहिती भाजप तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड व शहराध्यक्ष शिवशरण जोजन यांनी दिली. याशिवाय कुरनूर व बोरामणी येथे केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचीही दोन दिवसात जाहीर सभा होणार असल्याचे समजते.शहा यांच्या सभेस अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन भाजपच्यावतीने करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!