ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मनोज जरांगे पाटलांची पायी दिंडी पुण्यात आज होणार दाखल

पुणे : वृत्तसंस्था

राज्यातील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातून निघालेली मनोज जरांगे यांची पायी दिंडी पुण्यात दाखल झाली आहे. बीड आणि अहमदनगर असे तीन जिल्ह्यांचा प्रवास करून जरांगे पुणे जिल्ह्यात दाखल झाले आहेत. तिसऱ्या दिवशी म्हणजेच 22 जानेवारीचा मुक्काम त्यांनी रांजणगाव गणपती येथे केला. दरम्यान, आज दुपारच भोजन भीमा कोरेगाव येथे केले जाणार आहे. तर,आजचा मुक्काम पुणे जिल्ह्यातील चंदननगर येथे केला जाणार आहे. विशेष म्हणजे आज आणि उद्याचा प्रवास करून 26 जानेवारीला मनोज जरांगे मुंबईत धडकणार आहे.

मनोज जरांगे म्हणाले की, प्रभू श्रीराम व छत्रपती शिवराय‎माझी आस्था व आराध्य आहेत. माझ्या मराठा‎आरक्षण लढाईला त्यांनीच बळ दिले आहे.‎त्यामुळे आरक्षण मिळाल्यावर अयोध्येत जाऊन‎प्रभू श्रीरामांचे दर्शन घेईल, असे त्यांनी सांगितले.‎ मनोज जारांगे पाटील यांचा मोर्चा आज पुणे शहरात प्रवेश करणार आहे. जरांगे पाटील यांच्या मोर्चामुळे पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. पुण्यातून अहमदनगरकडे जाणारी वाहतूक आज सकाळी सहा वाजल्यापासून बंद आहे. नगरकडे जाण्यासाठी पर्यायी मार्गचा करावा वापर करावा लागणार आहे. पुणे शहरातून नगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने खराडी बायपास वरून वळण घेत मगरपट्टा चौकातून सोलापूर रस्त्याने मार्गस्थ करण्यात येतील. जरांगे पाटील यांचा मोर्चा आज पुण्यातील खराडी येथे मुक्कामी असणार आहे. जरांगे पाटील यांच्या मोर्चाच्या मार्गावरील अनेक मुख्य रस्ते आज वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!