---Advertisement---

आजपासून सर्वसामान्यांसाठी रामलल्लाचे दरवाजे खुले

By team
On: January 23, 2024 3:30 PM
Follow Us:
---Advertisement---

अयोध्या : वृत्तसंस्था

अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठानंतर आता सर्वसामान्यांनाही राम मंदिराचे दर्शन घेता येणार आहे. प्राणप्रतिष्ठामुळे बाहेरून येणाऱ्या लोकांचा अयोध्येत प्रवेश बंद करण्यात आला होता. आता हे निर्बंध हटवण्यात आले आहेत. दर्शनासाठी मंदिराचे दरवाजे कधी उघडतील, दर्शनासाठी जाण्याची प्रक्रिया काय असेल, मंदिराच्या आत काय काय नेले जाऊ शकते याबद्दल दिव्य मराठी सांगत आहे. याशिवाय अयोध्येला कसे जायचे आणि कुठे राहायचे?

आजपासून म्हणजेच 23 जानेवारीपासूनच सर्वसामान्य भक्तांना रामलल्लाचे दर्शन घेता येईल. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी 15 जानेवारीला सांगितले होते की 23 जानेवारीपासून मंदिर प्रत्येक राम भक्तांसाठी खुले होईल. 22 जानेवारीच्या रात्री रामलल्लाची पहिली शयन आरती नवीन मंदिरात झाली. यानंतर दरवाजे बंद करण्यात आले. 23 जानेवारी रोजी उत्थान आरतीनंतर मंदिर सर्व भाविकांसाठी खुले आहे.

राम मंदिर सकाळी 7 ते 11:30 पर्यंत भाविकांसाठी खुले असेल. यानंतर प्रभूची मध्यान्ह आरती होईल. दुपारी सुमारे अडीच तास मंदिर विश्रांतीसाठी बंद राहणार आहे. दुपारी २ वाजता पुन्हा मंदिराचे दरवाजे उघडतील आणि संध्याकाळी ७ वाजेपर्यंत रामलल्लाचे दर्शन होईल. मात्र, ट्रस्ट दर्शनाची वेळ वाढविण्याच्या विचारात आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!