नांदेड : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटलांनी लढा उभा केला असून सरकारने दिलेली वेळ सुद्धा आता संपत आली आहे. तोवर कुठलाहि निर्णय होत नसल्याने आता मराठा समाज आक्रमक झाला असून आज आंदोलकांनी थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना काळे झेंडे नांदेडमध्ये दाखविले आहे.
आज चंद्रशेखर बावनकुळे यांचा ताफा नांदेडमधील मुखेडमध्ये दाखल होताच मराठा आंदोलकांनी त्यांना काळे झेंडे दाखवल्याची घटना घडली आहे. यावेळी मराठा आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. यावेळी ‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे’ अशा प्रकारच्या घोषणा या मराठा आंदोलकांनी दिल्या. दरम्यान, या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.