ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मराठा समाज लोकसभेला देणार ११० उमेदवार

अकलूज : वृत्तसंस्था

राज्यात गेल्या काही महिन्यापासून मराठा सामाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटलांनी सरकार विरोधात मोठा लढा उभा केला असतांना नुकतेच त्यांच्या या भूमिकेला समर्थन देण्यासाठी माळशिरस सकल मराठा समाज तालुक्यातील ११० गावांतून किमान ११० तरी उमेदवार लोकसभेला देण्याचा निर्णय घेण्यात आला.

मराठा आरक्षणाच्या मागणीची रणनीती म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने लोकसभा निवडणुकीत राज्यातील प्रत्येक मतदार संघातून जास्तीत जास्त उमेदवार देण्याचे ठरले असून संपूर्ण राज्यातून त्यास मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाज माळशिरस तालुक्याची अकलूज येथील शासकीय विश्रामगृहावर बैठक झाली. त्यामध्ये समाजाच्या धोरणांना पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण तालुक्यातील प्रत्येक गावातून किमान एक तरी उमेदवार या निवडणुकीत उतरवण्याचे ठरले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!