---Advertisement---

मराठा मूक आंदोलन पुढे ढकलले, सरकारला एक महिन्याचा डेडलाईन

Follow Us:
---Advertisement---

नाशिक: मराठा आरक्षणासाठी पुणे ते विधानभवन लाँगमार्च काढावा अशी आमची इच्छा नाही. सरकारने एक महिन्यात आमच्या मागण्या मार्गी लावाव्या. आमची आंदोलने थांबली नाहीत. बैठकाही सुरूच राहणार आहेत. मात्र, सरकार 21 दिवसात प्रश्न मार्गी लावत असल्याने एक महिना मराठा मूक आंदोलन पुढे ढकलत आहोत, असं जाहीर करतानाच या महिन्याभरात आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, असा इशारा खासदार संभाजी छत्रपती यांनी दिला आहे.

छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी नाशिकमध्ये मूक मोर्चाचे आयोजन केले होते. त्यानंतर संध्याकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. छत्रपती संभाजी राजे म्हणाले की, सरकारने मागण्या मान्य केल्या आहेत. त्याची अंमलबजावणी व्हायला २१ दिवस लागतील. प्रशासकीय स्तरावर त्याची अंमलबजावणी होत आहे. असं सांगतानाच समन्वयकांनी आंदोलन न थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारने एक महिन्यात मागण्या पूर्ण कराव्यात नाही तर पुढची दिशा ठरवावी लागेल, असं संभाजी छत्रपती यांनी सांगितले. तसेच मराठा मूक मोर्चा एक महिन्यासाठी स्थगित करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्य सरकारने येत्या गुरुवारी पुनर्विचार याचिका दाखल करणार असे सांगितले आहे. आयोग स्थापन करण्यात अडचणी असतील तर गायकवाड कमिशनच्या त्रुटी दूर करण्यासाठी होमवर्क करण्यासाठी पावले उचला असे सरकारला सांगितलं आहे. त्यावर सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

आम्ही मराठा आरक्षणासाठी कोल्हापूर, नाशिक, रायगड, औरंगाबाद आणि अमरावती या ठिकाणी मूक आंदोलन करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार कोल्हापूर आणि नाशिकमध्ये आंदोलन झाले आहे. ३६ जिल्ह्यात जायची आमची इच्छा नाही. आम्हाला समाजाला दिशाहीन करायचं नाही. त्यांना दिशा द्यायची आहे. सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, समाजाला वेठीस धरू नये, असं छत्रपती संभाजी राजे म्हणाले. यावेळी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीचा तपशील ही दिला. तसेच सरकारने मागण्या मान्य केल्या असून सरकार सकारात्मक असल्याचेही त्यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!