राज्यातील अनेक तरुणीन खोटे सांगून लग्न लावून घेत असल्याच्या अनेक घटना गेल्या काही दिवसापासून उजेडात येत असतांना शीच एक धक्कादायक घटना बार्शी येथे घडली आहे. अॅन्टी करप्शन ब्यूरो मध्ये अॅडिशनल एसपी असल्याचे भासवून पिडीतासोबत लग्न करून जबरदस्तीने अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवत माहेरवरून १० लाख रूपये घेऊन ये, असे म्हणत तसेच फिर्यादीचा विश्वासघात करुन फसवणूक केल्या प्रकरणी पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध बार्शी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. यात पती वाल्मीक वाघ सह सासरचे सुमन वाघ, जगन्नाथ वाघ, मनिषा म्हस्के, प्रदिप म्हस्के, भगवान वाघ व प्रिया मोरे या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
पुणे येथे फिर्यादी पिडीता व वाल्मीक वाघ यांची ओळख झाली. यावेळी वाल्मिकने अॅन्टी करप्शन ब्यूरो मध्ये अॅडिशनल एसपी असल्याचे ओळखपत्र दाखवले. दरम्यान, त्याने त्याचे कंपनीत पिडीताला नोकरी लावली या दरम्यान पिडीतेला लग्नासाठी प्रपोज केला. त्यास पिडीताने नकार दिला. एकेदिवशी वाल्मीकी हा मद्यपान करून पिडीताच्या रुमचे आला व माझ्यासोबत लग्न कर नाही तर मी माझेकडील रिव्हॉल्वरने स्वताःला गोळी झाडून घेऊन जीव देतो, असे म्हणाला. यावेळी पिडीताने त्यास समजावून सांगितले. मात्र, त्यानंतर लग्नासाठी फोन करत होता. पिडीता व तिच्या आईने वाल्मीकी याच्या आई-वडीलांशी भेट घेतली. यावेळी वाल्मीकी याचे वडीलांनी माझा मुलगा अधिकारी आहे तुमच्या मुलीला सुखात ठेवेल, असे सांगितल्यानंतर पिडीता व वाल्मीकी यांचे लग्न झाले. त्यानंतर आठ दिवसाची सुट्टी असल्याने वाल्मीकी याचे मूळ गावी नाळे (ता. मालेगाव) येथे राहते घरी व मालेगाव येथील हॉटेलमध्ये नेवून पिडीतावर जबरदस्तीने अनैसर्गिक संभोग केला. दरम्यान, वाल्मिकी याने गाडी घेण्यासाठी पिडीतास तुझ्या आईकडून दहा लाख रूपये घेऊन ये, म्हटल्यावर एवढे पैसे ते कसे देणार… हे ऐकून त्यांनी पिडीतास शिविगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली.
सदरचा प्रकार पिडीताच्या सासरी कळाल्याने सासू सुमन वाघ, सासरे जगन्नाथ वाघ, मनिषा म्हस्के, प्रदिप म्हस्के, भगवान वाघ व प्रिया मोरे असे सगळे मिळून पुणे येथे घरी आले. माझे सासु-सासरे सर्वांनी पतीला समजावून सांगण्याऐवजी पिडीताला तुला पैसे आणायला काय होतेय, असे म्हणून शिविगाळी करून जाचहाट केला. तसेच त्यांचेसोबत आलेली प्रिया मोरे हि सुध्दा पिडीतास शिविगाळ करू लागली असता पिडीताने तिला तुझा काय संबंध विचारले असता पती वाल्मीकी हे प्रिया ही माझी पत्नी असल्याचे सांगितले. यावेळी पिडीतास तिची फसवणूक झाल्याचे लक्षात आले.