---Advertisement---

लाचखोर शिक्षणाधिकारीची मालमत्ता जप्त !

By team
On: December 8, 2023 10:26 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर जिल्हा परिषदेतील तत्कालीन लाचखोर शिक्षणाधिकारी किरण अनंत लोहार याच्या पाचगाव (ता. करवीर) येथील घरावर लाचलुचपत विभागाने केलेल्या छापेमारीत बेहिशोबी मालमत्तांची कागदपत्रे मिळाली असून, या सर्व मालमत्तांवर आता जप्तीची कारवाई केली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सोलापूर आणि कोल्हापूरच्या पथकाने बुधवारी रात्री उशिरापर्यंत केलेल्या कारवाईत लोहार याच्या घरातून चार लाखांची रोकड आणि मालमत्तांची कागदपत्रे जप्त केली. त्याच्याकडे ५ कोटी ८६ लाखांची बेहिशेबी मालमत्ता असल्याचे स्पष्ट झाले. चार कार मिळाल्या असून, यातील दोन कार लोहार याच्या नावावर आहेत, तर दोन कार अन्य नातेवाइकांच्या नावावर आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!