---Advertisement---

महिना अखेरपर्यंत होणार मविआचे जागावाटप !

By team
On: January 10, 2024 9:22 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी उमेदवार चाचपणी सुरु असतांना जानेवारी अखेरपर्यंत महाविकास आघाडीचे लोकसभा निवडणुकीसाठीचे जागावाटप अंतिम होईल. सध्या जागा कोणाकडे, जागा कोणी लढवली तर कुणाला जास्त मते मिळतील या आधारावर जागावाटप करताना विचार केला जाईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

पवार म्हणाले, काँग्रेसकडे जास्त जागा असून जिंकण्याची क्षमता आहे. राष्ट्रवादी ८-९ जागांवर लढण्याची चर्चा होऊ शकते. महाराष्ट्रात मविआमध्ये वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यावे, ही आमची भूमिका आहे. सध्या इंडिया आघाडीमध्ये सर्व पक्षांची एकमेकांशी सुसंगत अशी भूमिका घेण्याची तयारी दिसते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!