ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर

मुंबई, वृत्तसंस्था 

 

विधानसभा निवडणुकीनंतर कोणत्या पक्षांना किती आणि कोणती मंत्रीपदं मिळणार ? याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. त्यातच मुख्यमंत्री पद कोणाला मिळणार यावर चर्चा सुरू आहेत. त्यातच महायुतीतील मंत्रिमंडळाचा अंदाजित फॉर्म्युला आणि कोणत्या नेत्यांना मंत्रीपदं मिळू शकतात, याची संभाव्य यादी समोर आली आहे.

 

महायुतीमध्ये मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला हा नेहमीप्रमाणे ज्याच्या जास्त जागा त्याला जास्त मंत्रिपदं असाच असणार आहे. त्यानुसार 21, 12, 10 असा फॉर्म्युला असू शकतो. यात अर्थातच भाजपला सर्वाधिक म्हणजे 20 ते 25 मंत्रिपदं, शिवसेनेला 10 ते 12 मंत्रिपदं आणि राष्ट्रवादीला 7-9 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. या संदर्भातली प्राथमिक चर्चा झाली असून पक्षांमध्ये अंतिम निर्णय सुरू आहे. त्याचबरोबर भाजपातून मंत्रीपदासाठी काही नेत्यांची नावं चर्चेत असल्याची माहिती मिळाली आहे.

 

भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी

 

1. देवेंद्र फडणवीस – मुख्यमंत्री पदाचे प्राधान्याने दावेदार, व्हिजनरी नेता म्हणून प्रसिद्ध, एकनाथ शिंदेंसाठी मुख्यमंत्रीपदाचा केलेला त्याग, राज्यासह केंद्रातील नेत्यांचीही इच्छा

 

2. चंद्रशेखर बावनकुळे – विधानसभेत विजय मिळवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष म्हणून केलेलं काम

 

3. गिरीश महाजन – लोकसभा आणि विधानसभेत महायुतीला उत्तर महाराष्ट्रात यश मिळवून देण्यासाठी केलेलं काम, अडचणीच्या काळात पक्षाचे संकट मोचक म्हणून प्रसिद्ध

 

4. पंकजा मुंडे – ओबीसी चेहरा, मराठवाड्याच्या राजकारणातील मोठं नाव

 

5. मंगलप्रभात लोढा – मुंबई भाजपातील मुख्य नेत्यांपैकी एक, उत्तर भारतीय समाज, गुजराती आणि जैन समाजातील चेहरा

 

6. रविंद्र चव्हाण – कोकणातील यशामागचा चेहरा, भाजपाचा ब्रेन म्हणून प्रसिद्ध

 

7. नितेश राणे – हिंदुत्वासाठी पुढाकार घेणारा मोठा चेहरा, कोकणातील नागरिकांचे प्रतिनिधित्व करणारे नेते

 

8. आशिष शेलार – मुंबई अध्यक्ष म्हणून मोठं काम, निवडणुकीतील यशामागचा चेहरा, कटेंगे तो बटेंगे, एक है तो सेफ है नाऱ्याचा प्रचार करत नोमानी व्हीडिओ प्रकरण समोर आणणारे नेते

 

9. शिवेंद्रसिंहराजे भोसले – राजघराण्याचा चेहरा, मराठा समाजाचे प्रतिनिधी, पश्चिम महाराष्ट्रातील मोठी ताकद

 

10. माधुरी मिसाळ – पुण्यातील पर्वती मतदारसंघाच्या चार टर्म आमदार, पुणे भाजपातील मोठं नाव

 

11. राहुल कुल – दौंडमधून तीन वेळा विजयी, तालुक्यातून राष्ट्रवादीची ताकत कमी करण्यात मोठा वाटा

 

12. राधाकृष्ण विखे पाटील – भाजपाचे ज्येष्ठ नेते, अहिल्यानगरचं प्रतिनिधित्व करणारा चेहरा

 

13. संजय कुटे – राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील मोठा चेहरा, विदर्भात मोठी ताकद, फडणवीस यांचे विश्वासू सहकारी

 

14. गोपीचंद पडळकर – राज्यातील ओबीसी-धनगर चेहरा, मोठी आंदोलनं उभी करणारे नेते

 

15. गणेश नाईक – नवी मुंबई भाजपातील मुख्य फळीतील चेहरा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!