ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मिरजगी जवळच्या अपघातात आमदार कल्याणशेट्टी यांची संवेदनशीलता

केरूर ग्रामपंचायतीने मानले आभार

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

मिरजगी फाट्याजवळ झालेल्या अपघातातील मृतांबद्दल संवेदनशीलता दाखवून तातडीने मदत केल्याबद्दल नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील केरूर ग्रामपंचायतीने आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे आभार मानले आहेत.याबद्दल त्यांनी ग्रामपंचायतीमार्फत आभार पत्र देऊन आमदार कल्याणशेट्टी  यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली आहे. बुधवारी,अक्कलकोट जवळच्या अपघातामध्ये देगलूर बिलोली मतदारसंघातील पाच जणांचा दुर्दैवीरित्या अपघाती मृत्यू झाला होता.वास्तविक पाहता आमदार कल्याणशेट्टी हे घटनास्थळी नव्हते. ते मुंबईमध्ये होते.

तरी देखील जखमी व्यक्तींची प्रकृतीची विचारपूस करून त्यांना सोलापूर या ठिकाणी अश्विनी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले व मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना त्यांच्या घरापर्यंत दोन ॲम्बुलन्स देऊन स्वखर्चाने त्यांना सोडण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल आमदार कल्याणशेट्टी यांचे केरूर ग्रामपंचायतीचे सरपंच दैवशीला कुरणापल्ले यांनी पत्र पाठवून आभार व्यक्त केले आहेत.अनेक वेळा स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक दर्शनासाठी येतात.पण दुर्दैवाने अशावेळी एखादा अपघात होतो आणि त्यांना त्यावेळी मदत करण्यासाठी त्यांच्या भागातील कोणी व्यक्ती मदतीला नसतात अशावेळी मदत करण्याची आपली नैतिक जबाबदारी असते, असे माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!