---Advertisement---

ईडीच्या रडारवर ठाकरे गटाचे आमदार !

By team
On: January 10, 2024 8:54 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

गेल्या काही महिन्यापासून ठाकरे गटाचे आमदारासह पदाधिकारी अनेक कारवाईच्या निमित्ताने चर्चेत येत असतांना नुकतेच जोगेश्वरी येथे बांधण्यात येणाऱ्या एका तारांकित हॉटेलच्या बांधकामाच्या परवानगीमध्ये झालेली अनियमितता आणि त्या प्रकरणी मनी लाँड्रिग झाल्याचा ठपका ठेवत ईडीने (सक्तवसुली संचालनालय) शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या निवासस्थानी मंगळवारी छापेमारी केली. एकूण सात ठिकाणी छापे टाकले.

सकाळी साडेसातपासून दुपारपर्यंत कारवाई सुरू होती. यापूर्वी ईडीने या प्रकरणी वायकर यांचा जबाब नोंदवला आहे. मंगळवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी वायकर यांचे निवासस्थान, मातोश्री क्लब तसेच त्यांचे व्यावसायिक भागीदार आसू नेहलानी, राज लालचंदानी, प्रिथपाल बिंद्रा आणि वास्तुविशारद अरुण दुबे यांच्या निवासस्थानीही छापेमारी केल्याची माहिती आहे. या प्रकरणी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे महापालिकेत कार्यरत सब-इंजिनिअर संतोष मांडवकर यांनी तक्रार दाखल केली होती. याच आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!