ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यात मनसे आक्रमक : आ.मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला

मुंबई  : वृत्तसंस्था

राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीची चाहूल लागल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे राज्याच्या दौऱ्यावर बाहेर पडले असून नुकतेच अजित पवार गटाचे नते अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांचा उल्लेख सुपारीबाज असा करत जोरदार टीका केली होती. यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केला. या वेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मिटकरी यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. त्यामुळे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अजित पवार गट यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यावर आता अमोल मिटकरी यांनी देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकाऱ्यांवर पलटवार केला आहे. अकोल्यातील शासकीय विश्रामगृहाबाहेर माझी गाडी उभी असताना हा मागून हल्ला करण्यात आला. असे मागून हल्ला करणाऱ्या लोकांना आम्ही भीक घालत नाही. महाराष्ट्रामध्ये अशी गुंडागिरी चालणार नाही. या संदर्भात आपण पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केला असल्याचे अमोल मिटकरी यांनी सांगितले आहे.

दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांची गाडी फोडली असेल तर गैर काही नसल्याचे मनसेच्या वतीने सांगण्यात आले आहे. असे असेल तर मनसेचे मी अभिनंदन करतो, कारण कुणाच्या तोंडात येईल ते कोणीही बोलत असेल तर त्याला उत्तर दिले पाहिजे. चुकीचे भाषा वापरत असाल तर परिणाम भोगावेच लागतील असा इशारा देखील संदिप देशपांडे यांनी अमोल मिटकरी यांना दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!