ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मोदी सरकारने केवळ बहुमताच्या जोरावर देशावर कायदे लादले !

हिट अँड रन कायद्याविरोधात अक्कलकोटमध्ये निषेध आंदोलन

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

देशात मोदी सरकारने जे जे कायदे आणले ते कधीही लोकांना विश्वासात घेऊन आणले नाहीत.केवळ बहुमताच्या जोरावर त्यांनी कायदे करून सामान्य लोकांना अडचणीत आणण्याचे पाप केले आहे आता हिट अँड रन जो कायदा आहे तो तर ड्रायव्हरसाठी अतिशय घातक आहे या विरोधात सर्वांना संघटित होऊन लढा द्यावा लागेल.एका आंदोलनावर भागणार नाही कायदा जर त्यांनी मागे नाही घेतला तर यापेक्षा उग्र आंदोलन करावे लागेल,असे इशारा माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी दिला.

हिट अँड रन कायद्याविरोधात अक्कलकोटमध्ये शुक्रवारी बस स्टँडवर तालुक्यातील सर्व रिक्षा, टेम्पो, ट्रक आणि जीप चालकांनी मिळून निषेध आंदोलन केले.यावेळी ते बोलत होते.या आंदोलनाचे नेतृत्व माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे व काँग्रेस नेते अश्पाक बळोरगी यांनी केले होते.या आंदोलनादरम्यान सर्व वाहन चालकांनी केंद्र सरकारच्या या कायद्याचा तीव्र शब्दात निषेध केला. पुढे बोलताना म्हेत्रे म्हणाले की,देशात सर्वसामान्यांसाठी काही चांगले होताना दिसत नाही केवळ बहुमताच्या जोरावर नवनवीन कायदे करून सामान्य लोकांचे जगणे मोदी सरकारने मुश्किल केले आहे या सरकारला येत्या लोकसभा निवडणुकीत सर्वांनी मिळून धडा शिकवण्याची गरज आहे त्याशिवाय हे लोक वठणीवर येणार नाहीत, असेही ते म्हणाले.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बळोरगी म्हणाले, देशात ड्रायव्हरची संख्या कोट्यावधी मध्ये आहे हे जर सर्वजण मिळून एकत्र येऊन या सरकारला धडा शिकविण्याचा निर्णय घेतला तर हे सरकार पायउतार होण्यास वेळ लागणार नाही यासाठी सर्वांनी मिळून एकत्रित लढा देऊन हा कायदा हाणून पाडण्यासाठी वेळोवेळी आंदोलने करावे लागणार आहेत तरच या सरकारला जाग येणार आहे.शिवसेनेचे ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख आनंद बुक्कानुरे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राम जाधव, सुनील खवळे,विठ्ठल चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुनिल कटारे,शहरप्रमुख सिद्धाराम गुब्याड,मल्लीनाथ खुबा,राष्ट्रवादीच्या महिला तालुकाध्यक्ष माया जाधव,फारूख बबरची, सातलिंग गुडंरगी ,इरण्णा धसाडे,महादेव चुंगी,काशिनाथ कुंभार ,संजय डोंगराजे,विनीत पाटील, गुरू म्हेत्रे आदिंसह ड्रायव्हर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कायदा मागे घ्यावा लागेल
कृषी कायद्याच्या बाबतीतही असाच निर्णय केंद्र सरकारने घेतला होता अखेर शेतकऱ्यांपुढे सरकारला झुकावे लागले आता हिट अँड रन कायदा जो आहे तो देखील ड्रायव्हर लोकांना अतिशय जाचक आहे हा कायदा जर मागे नाही घेतला तर देशात अराजकता माजेल. हा कायदा देखील सरकारला मागे घ्यावा लागेल.
– सिद्धाराम म्हेत्रे, माजी मंत्री

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!