---Advertisement---

देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला मोदी सरकार जवाबदार- खासदार राहुल गांधी

Follow Us:
---Advertisement---

दिल्ली : देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचा सरकारच जवाबदार आहेत असा थेट आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केला आहे.काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकारपरिषद घेत मोदी सरकारवर निशाणा साधला.

खासदार राहुल गांधी यांनी देशातील कोरोना परिस्थिती आणि लसीकरण संदर्भात मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. सरकार आणि पंतप्रधान मोदी यांना कोरोना काय आहे हे समजलच नाही अशी टीका राहुल गांधी यांनी यावेळी केली.

राहुल गांधी म्हणाले, आम्ही अनेकदा सरकारला करोना संदर्भात सतर्क केलं होतं. मात्र सरकारने आमची चेष्टा केली. कोरोना केवळ एक आजार नाही, कोरोना हा बदलत असलेला आजार आहे. जेवढा वेळ तुम्ही त्याला द्याल, तेवढाच हा घातक होत जाईल. अमेरिका आणि ब्राझील हे देश लसिंसाठी कॅपिटल नाही. भारत हा लसींचा कॅपिटल देश आहे. सद्य ज्या पद्धतीने लसीकरण सुरू आहे याच पद्धतीने सुरू राहिला तर देशातील लसीकरण पूर्ण होण्यास २०२४ उजाडेल असेही राहुल गांधी म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!