सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर सरकारच्या आश्रयाने लाखो रुपये घेऊन स्पर्धा परीक्षांचे, प्रवेश परीक्षांचे पेपर फोडले जात आहेत. यामुळे मेरीटमधील विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. केंद्रातील खिचडी सरकार आणि राज्यातील तिघाडी सरकार आपल्याच राजकारणात व्यस्त आहे, अशी टीका शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी केली.
सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध करण्यासाठी चिखलफेक आंदोलन करण्यात आले. पूनम गेट येथे निषेध करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. नरोटे म्हणाले, देशातील मोदी, राज्यातील भाजप, एकनाथ शिंदे, अजित पवार सरकारच्या नाकर्तेपणामुळे महागाई, बेरोजगारी वाढली. नोकर भरती होत नाही. उलट महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवून नेले जात आहेत.
यावेळी महिला अध्यक्ष प्रमिला तूपलवंडे, माजी नगरसेविका परवीन इनामदार, भीमाशंकर टेकाळे, अंबादास बाबा करगुळे, दत्तू बंदपट्टे आदी उपस्थित होते. पेपर फोडून गुणवंतांवर अन्याय सरकारच्या आश्रयाने लाखो रुपये घेऊन स्पर्धा परीक्षांचे, प्रवेश परीक्षांचे पेपर फोडले जात आहेत. यामुळे मेरिट मधील विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. अशा अनेक घटना घडत असताना सुद्धा केंद्रातील खिचडी सरकार आणि राज्यातील तिघाडी सरकार आपल्याच राजकारणात व्यस्त आहे. जातीधर्मात तेढ निर्माण करून आपले अपयश झाकण्याचे काम करत आहे, अशी टीका करण्यात आली.