राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमात नागनहळळी आश्रम शाळेने मारली बाजी
बहुपयोगी कृषी यंत्रास तृतीय क्रमांकाचे पारितोषिक
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी मल्टी मेगा इव्हेंट या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाचे आयोजन सिंहगड संस्थेच्यावतीने सोलापुरात करण्यात आले होते.त्यामध्ये अक्कलकोट तालुक्यातील नागनहळळी आश्रमशाळेच्या जमीर जमादार, जुबेर जमादार व बसवराज आजूरे या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या बहुपयोगी कृषी यंत्रास राष्ट्रीय स्तरावरून तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.राज्यातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातील व विद्यालयातील २१८ स्पर्धकांनी भाग घेतला होता.रेशीम उद्योगाची फिरती प्रयोगशाळा, कृषी मूल्यवर्धन व कौशल्य प्रदर्शनाचे आयोजन यात करण्यात आले होते.
या प्रदर्शनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांनी उपकरणाची निर्मिती केली होती.विशेष म्हणजे आश्रमशाळेच्या विदयार्थ्यांनी बहुउददेशीय कृषी यंत्र निर्मिती करून संशोधनात नवे पाऊल टाकले आहे.यापूर्वी या उपक्रमास जिल्हयातून प्रथम क्रमांक प्राप्त होऊन राज्यस्तरीय हॅकेथॉन प्रदर्शनासाठी निवड झाली होती.हे यंत्र शेतातील तण काढण्यासा ठी औषध फवारणी करण्यासाठी व शेती कामासाठी वापर करता येते.विशेष म्हणजे रिमोट कंट्रोलव्दारे याला नियंत्रित करता येते व त्याचे कार्य मोबाईलवरील देखील स्क्रीनवर पाहता येते.या विद्यार्थ्यांना प्रा.रवींद्र नवले,प्रा.वसीम शेख,प्रा.अमोल पाटील यांनी मार्गदर्शन केले.सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे सचिव जावेद पटेल, प्राचार्य आय.एम.मुजावर मुख्याध्यापक आर.जी.शेख व प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.