ध्यास विश्वसार्ह बातमीचा

वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी जाऊ नये ; भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य !

पुणे : वृत्तसंस्था

राज्यातील शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे हे नेहमीच वादग्रस्त विधान केल्याने नेहमीच चर्चेत येत असतात त्यांनी पुन्हा एकदा पुण्यात एक वादग्रस्त विधान केल्याने या विधानानंतर पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे. आपल्याला १५ ऑगस्ट रोजी जे स्वातंत्र्य मिळाले ते दळभद्र आणि हांडग स्वातंत्र्य आहे. आपल्याला ते जमत नसून स्वतंत्र हिंदवी स्वातंत्र्य पाहिजे, अशी वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी जाऊ नये आणि ड्रेस घातलेल्या बायकांनीदेखील जाऊ नये, असे वादग्रस्त विधान शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी रविवारी पुण्यात केले.

संभाजी भिडे हे पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आले होते. या वेळी त्यांनी जंगली महाराज रस्त्यावर वारकऱ्यांसोबत संवाद साधताना पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले. दरम्यान, पुणे पोलिसांनी संभाजी भिडे यांना पुण्यात आल्यावर नोटीस दिली. पालखीला मानवंदना करताना कायदा व सुव्यवस्था भंग होणार नाही, याची काळजी घ्या. तेढ निर्माण करणारी भाषणे करू नका, अशा सूचना पुणे पोलिसांनी संभाजी भिडे यांना दिल्या होत्या. मात्र, त्यानंतरही त्यांनी महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. यापूर्वीही त्यांनी महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्ये केली होती. त्यानंतर त्यांचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात आला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!