ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पवार गटाला नवे नाव : ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार

मुंबई : वृत्तसंस्था

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ असे नाव मिळाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने बुधवारी यासंदर्भात घोषणा केली. आगामी राज्यसभा निवडणुकीपुरते हे नाव असेल, असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निर्णय मंगळवारी निवडणूक आयोगाने दिला होता. यासोबतच घड्याळ हे पक्षचिन्हदेखील अजित पवार गटाला देण्यात आले, तर शरद पवार यांच्या गटाला नवे नाव व चिन्हासाठी तीन पर्याय सुचवण्यास सांगण्यात आले होते. यासाठी बुधवारी दुपारी चार वाजेपर्यंतची मुदत दिली होती. त्यानुसार शरद पवार गटाने ई-मेल पाठवून आपले पर्याय दिले होते. नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदराव पवार, अशी नाव व चिन्हासाठी तीन पर्याय सुचवण्यास सांगण्यात आले होते. यासाठी बुधवारी दुपारी चार वाजेपर्यंतची मुदत दिली होती. त्यानुसार शरद पवार गटाने ई-मेल पाठवून आपले पर्याय दिले होते. नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, नॅशनॅलिस्ट तीन नावे या गटाने आयोगाकडे पाठवली होती. त्यांपैकी नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या नावावर आयोगाने शिक्कामोर्तब केले. त्यामुळे शरद पवारांचा गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार किंवा एनसीपी शरदचंद्र पवार या नावाने ओळखला जाईल. राज्यसभा निवडणुकीपुरती ही व्यवस्था आहे. येत्या काही दिवसांत राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागा आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!