---Advertisement---

ठाकरे गटाचा नवा प्लान : विभागीय नेत्यांची यादी जाहीर

By team
On: November 27, 2023 2:19 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

जानेवारी महिन्यात उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार आहे. तसेच ठाकरे गटाकडून राज्यव्यापी शिबिर घेतले जाणार असून त्यापूर्वी आता शिवसेनेने विभागीय नेत्यांची यादी जाहीर केली. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र ,कोकण, मराठवाडा, पश्चिम आणि पूर्व विदर्भाची जबाबदारी दहा नेत्यांवर सोपविण्यात आली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या संघटनात्मक बांधणीसाठी ही तयारी करण्यात आली आहे.

या यादीत संजय राऊत यांच्यावर उत्तर महाराष्ट्रासह, नगर, शिर्डी, पुणे, मावळची जबाबदारी देण्यात आली आहे. भास्कर जाधव यांच्याकडे पूर्व विदर्भाची जबाबदारी देण्यात आली आहे. अनिल देसाई पश्चिम महाराष्ट्र, राजन विचारे ठाणे-पालघर, चंद्रकांत खैरे, रवींद्र वायकर, सुनील प्रभू यांच्याकडे मराठवाडा तर अनंत गीते, तर अरविंद सावंत पश्चिम विदर्भ, तर विनायक राऊत यांच्याकडे कोकणची जबाबदारी दिली गेली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!