ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बारामतीवर कोणाची मालकी नाही ; शिवतारे उतरणार मैदानात

पुणे : वृत्तसंस्था

राज्यातील बारामती मतदार संघात गेल्या अनेक वर्षापासून शरद पवार परिवाराच्या उमेदवार नेहमी निवडून येत असतांना आता माजी शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी बारामतीत अखेर लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. बारामतीवर कोणाची मालकी नाही, मी लढणार म्हणजे लढणारच असे म्हणत त्यांनो निवडणुकी लढणार असल्याचे जाहीर केले आहे. विजय शिवतारे हे बारामतीतून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यामुळे आता बारामतीत पवार कुटुंब विरुद्ध विजय शिवतारे असा सामना रंगणार आहे.

आज विजय शिवतारे यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत एकमताने विजय शिवतारे यांच्या लोकसभा निवडणूक लढवण्याचा प्रस्तावावर मंजूरी मिळाली. शिवाय बैठकीत पुरंदर आणि हवेली येथील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शिवतारे माघार घेऊ नका, असा पाठिंबा कार्यकर्त्यांनीही दिला आहे. त्यानंतर आपण बारमती लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे विजय शिवतारे यांनी सांगितले.

पवार विरुद्ध बारामतीमधील सर्वसामान्य माणूस अशी ही निवडणूक असेल. बारामती लोकसभा मतदारसंघ हा कोणाचा सातबारा नाही. देशातील एक मतदारसंघ असून, त्यावर कोणाची मालकी नाही. त्यामुळे स्वाभिमान जागरुक ठेवून लढलं पाहिजे” असे शिवतारे म्हणाले. याशिवाय सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना लोकं मते देऊ इच्छित नाहीत असेही शिवतारे म्हणाले.

दरम्यान यावेळी बोलतांना विजय शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर हल्लाबोल करत गंभीर आरोप केले. “2021 च्या निवडणुकीत मी अजित पवारांच्या मुलाच्या विरोधात प्रचार केला होता. तो राजकारणाचा भाग होता. पण त्यांनी सभ्यतेची नीच पातळी गाठली होती. मी 23 दिवस लिलावतीत दाखल होतो. मला बायपास करायला सांगितली असता मी केली नव्हती. मी रुग्णवाहिकेतून प्रचार केला होता. त्यावेळी मरायला आले असताना कशाला निवडणूक लढवत आहात असे म्हंटले होते. त्यांनी माझ्यावर सहानुभूती मिळवत असून खोटं बोलत असल्याचा आरोप केला होता. इतकेच नाही तर माझ्या गाडीचा नंबर मिळवला होता. अजित पवार खालच्या थराला गेले होते” अशी टीका शिवतारे यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!