ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आता काम कि बात करो ; माजी मुख्यमंत्री ठाकरे

नाशिक : वृत्तसंस्था

राज्यातील ठाकरे व शिंदे गटात केल्या काही वर्षापासून आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दि.२२ रोजी नाशिक येथील काळाराम मंदिरात दर्शन घेवून आज शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन मेळावा घेतला आहे. यात ठाकरेंनी भाजपसह शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.

ठाकरे म्हणाले कि, ही शिवसेना मला वडिलोपार्जीत मिळाली आहे. होय मला हे वारश्याने मिळालेले आहे. माझे शिवसैनिक मला मिळाले आहेत. आम्ही प्रयत्न केला म्हणून आज भाजप सत्तेत असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. या वेळी त्यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. 75 वर्षांत काँग्रेसने काय केले? असा प्रश्न विचारणाऱ्यांनी आता दहा वर्षांत काय केले? याचे उत्तर देण्याची ही वेळ आली आहे. राम की बात झाली, आता काम की बात करो? असे आवाहन देखील उद्धव ठाकरे यांनी केले.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, मोदी पंतप्रधान व्हावे, म्हणून आम्ही देखील प्रचार केला होता. मी देखील मोदींना पंतप्रधान करण्यासाठी प्रचार केला होता. त्या वेळी आम्ही घोटाळेबाज नव्हतो का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. आता कोरोना काळातील घोटाळे काढले जात आहेत. मात्र, तेवढेच नाही तर सर्व मनपातील घोटाळे बाहेर काढा असे आवाहन देखील उद्धव ठाकरे यांनी केले. या वेळी त्यांनी पीएम केअर मधील घोटाळा देखील समोर आणण्याचे आवाहन केले. पीएम केअर फंडात मिळालेला पैसा कुठे गेला, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. रुग्णवाहिकेत झालेल्या घोटाळ्याबाबत तुम्ही बोलत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.

75 वर्षांत काँग्रेसने काय केले? असा प्रश्न विचारणाऱ्यांनी आता दहा वर्षांत काय केले? याचे उत्तर देण्याची ही वेळ आली आहे. राम की बात झाली, आता काम की बात करो? असे आवाहन देखील उद्धव ठाकरे यांनी केले. आमच्यावर काँग्रेससोबत गेल्याचा आरोप करण्याचा अधिकार तुम्हाला नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. आमच्यावर हिंदूत्त्व सोडण्याचा आरोप आज करत आहे. 30 वर्ष भाजपसोबत राहिल्याने आम्ही निर्लज्य भाजपवाले झालो नाही, तर काँग्रेससोबत राहुल काँग्रेसवाले काय होणार? असा सवालही त्यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!