अक्कलकोट : प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाचे कार्य सातासमुद्रा पलीकडे पोहचलेले असून, महाप्रसाद घेण्यासाठी आलेल्या भक्तांना न्यासाचे ओजस्वी कार्य, समग्र माहितीचा आणि करीत असलेल्या कार्याचा व नियोजित कामांचा ध्वनी चित्रफित, लघु माहिती पटाद्वारे भव्य टीव्हीवर दाखविण्याचा शुभारंभ शुक्रवारी अक्षय तृतीयाच्या शुभ मुर्हूतावर महाप्रसादालयात श्रींना नेवैद्य दाखविल्यानंतर महाप्रसादाच्या वेळेस हजारो स्वामी भक्तांच्या उपस्थितीत करण्यात आला.
दरम्यान ध्वनी चित्रफित, लघु माहिती पटाद्वारे भव्य टीव्हीवर दाखविण्याचा शुभारंभ प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी यांनी मंत्रपठण, विधिवत पूजन केले. ध्वनी चित्रफित, लघु माहिती पटाद्वारे टीव्हीवर न्यासाच्या प्रारंभापासून आज मितीपर्यंत न्यासाचे ओजस्वी कार्य, समग्र माहितीचा आणि करीत असलेल्या कार्याचा व नियोजित कामांची माहिती भक्तांपर्यंत पोहचावी या उदात्य हेतूने भव्य टीव्ही संच बसविण्यात आला आहे.
सदर ध्वनी चित्रफित, लघु माहिती पट तयार करण्या कामी न्यासाचे सचिव शामाराम मोरे, सदस्य अरविंद शिंदे, वास्तू विशारद योगेश अहंकारी, प्रसाद हुल्ले यांनी परिश्रम घेतले.
या उद्घाटना प्रसंगी सदस्य मनोज निकम, न्यासाचे अभियंता अमित थोरात, किरण पाटील, भरत राजेगावकर, एस.के.स्वामी, बाळासाहेब घाडगे, सिद्धाराम कल्याणी, शहाजीबापू यादव, कल्याण देशमुख, सतीश महिंद्रकर, मल्लिनाथ कोगणुरे, शावरेप्पा माणकोजी, शिवकुमार स्वामी, प्रविण घाडगे, विजय माने, नामा भोसले, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, देवराज हंजगे, चंद्रकांत हिबारे, राहुल,इंडे, काशिनाथ वाले, विश्वनाथ कलशेट्टी, खंडेराया होटकर, यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.