वेरूळ : वृत्तसंस्था
देशभरात आज महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात सुरु असतांना नुकतेच आता वेरुळ येथील घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. दर्शन रांगेत पुढे जात असताना भाविकांमध्ये फ्रीस्टाईल मारामारी झाली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे जात असताना हा सर्व प्रकार घडला आहे.
एक भाविक व्हीआयपी रांगेत घुसल्याने हा गोंधळ झाल्याने नियोजनाचा अभाव असल्याने हा प्रकार घडला म्हणत विरोधी पक्षनेत्यांनी नाराजी व्यक्त केजली आहे. भाविकांनी एकमेंकाना लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. सोशल माीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
घृष्णेश्वर मंदिर दर्शनाच्या रांगेत पुढे जाण्यासाठी भाविकांमध्ये फ्रीस्टाइल हाणामारी झाली. तर व्हीआयपी दर्शन रांगेतून विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे सहकुटुंब जात होते, त्यावेळी सार्वजनिक रांगेत उभे असलेले काही भाविक बॅरेगेट्स ओलांडून दानवे यांच्या मागे गेले. हा गोंधळ पाहून दानवे देखील माघारी परतले. काही वेळ बाहेर थांबले यानंतर त्यांनी घडलेल्या घटनेवर नाराजी व्यक्त केली.
अंबादास दानवे म्हणाले की, मला घृष्णेश्वराची पूजा करण्याचा मान मिळाला मी स्वत:ला भाग्यवान समजतो. परंतू महाशिवरात्रीच्या वेळी संस्कृतीचे रक्षण करत आपली पताका मजबूतीने ठेवली आहे. हे बळ आमच्या मनगटात येऊ देत अशी प्रार्थना केल्याचेही यावेळी अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी राज्याच्या प्रजेला सुखी आणि समृद्ध कर अशी प्रार्थना केली.