अक्कलकोट : प्रतिनिधी
अक्कलकोट शहरातील नामवंत ज्येष्ठ विधीज्ञ ऍड.शरद जाधव- फुटाणे यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त मोठ्या सत्कार समारंभाचे आयोजन दि.३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता भोसले मंगल कार्यालय, अक्कलकोट येथे करण्यात आले आहे.यानिमित्त सहपरिवार व मित्रमंडळीच्यावतीने नागरी सत्कार होणार आहे.
यावेळी विविध मान्यवर नेतेमंडळी तसेच विधी क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.ऍड. शरद फुटाणे यांनी अक्कलकोट शहरात १९७३ साली आपल्या वकिलीला सुरूवात केली.आज त्याला देखील ५० वर्ष पूर्ण होत आहेत.ते काही काळ फत्तेसिंह शिक्षण संस्था अध्यक्ष होते त्यानंतर सर्जेराव जाधव चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष म्हणून गेल्या १५ वर्षांपासून कार्यरत आहेत.या माध्यमातून विविध समाजपयोगी कार्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.सध्या ते अक्कलकोट राजेराय मठाचे अध्यक्ष म्हणून देखील कार्यरत आहेत.या संस्थेची त्यांनी ४३ वर्ष निरपेक्ष वृत्तीने सेवा बजावली आहे अक्कलकोट बार असोसिएशनचे ते माजी अध्यक्ष होते.त्यांच्या काळात पहिल्यांदा अक्कलकोटमध्ये लोकन्यायालय झाले होते.त्याला मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता पर्यंत त्यांना विविध क्षेत्रातून वेग – वेगळ्या संस्थाकडून अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.या सत्कार सोहळ्याच्या नियोजनासाठी विकास जाधव,संतोष जाधव – फुटाणे, सुमन जाधव- फुटाणे, दिपाली जाधव, शितल जाधव, पुनम जाधव, पल्लवी मोरे, पूनम माने, स्मिता माने, उज्वला इंगोले -पाटील, धनंजय गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रातील मित्रमंडळी परिश्रम घेत आहेत.