---Advertisement---

आता नवीन लोकांना संधी मिळणार ; शरद पवारांचा हल्लाबोल !

By team
On: December 2, 2023 5:25 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्याच्या राजकारणात अजित पवारांची राष्ट्रवादी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु असतांना आता शरद पवारांनी जोरदार हल्लाबोल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केला आहे.

शरद पवार म्हणाले कि, जे लोक सोडून गेले त्यांची चिंता करण्याच कारण नाही. जे सोडून गेले आहेत त्यामुळे नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. आता नवीन लोकांना संधी देण्याची गरज निर्माण झाली आहे. आता जास्तीत जास्त नव्या चेहऱ्यांना संधी देणार आहे. आम्ही विचारांशी बांधील आहोत, संधीसाधू नाही, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.

ज्यांच्यासाठी तुम्ही कष्ट केले, तुम्ही शक्ती दिली, तुमच्यामुळे ते शक्तिशाली झाले ते काही आपले सहकारी सोडून गेले. त्यामुळे अडचणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोणी गेले तर त्याची चिंता करण्याचे कारण नाही. कोणी गेले तर त्याची चिंता करण्याचे कारण नाही. संघटना स्वच्छ होत आहे..असा टोला शरद पवार यांनी यावेळी लगावला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!