पालकांनो लक्ष द्या : आपल्या मुलांच्या आरोग्याकडे !
जागतिक जंतनाशक दिनानिमित्त अक्कलकोट येथे कार्यक्रम
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
कृमीदोष बालकांना शारीरिकदृष्ट्या कमकुवत करतो याचा थेट दुष्परिणाम बालकांच्या शारीरिक व वैयक्तिक विकासावर होतो.त्यामुळे पालकांनी याकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे,असे मत डॉ. अमृता कोटी यांनी व्यक्त केले.श्री स्वामी समर्थ मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल व संस्कार प्री स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने अक्कलकोट येथे जागतिक जंतनाशक दिनानिमित्त बालरोग तज्ञ डॉ.कोटी यांच्या उपस्थितीत मार्गदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी त्या बोलत होत्या.
संस्थेचे प्रमुख डॉ.विपुल शहा,रूपाली शहा,डॉ.प्रदीप घिवारे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.कृमीदोष हा लहान वयात सहज होणारा व गंभीर आजार आहे. कृमीदोष बालकांना शारीरिक कमकुवत करतो याचा थेट दुष्परिणाम बालकांच्या शारीरिक व वैयक्तिक विकासावर होतो.आतड्यांमधील कृमीदोष हा बालकांमध्ये व किशोरवयीन मुला- मुलींमध्ये रक्तक्षय, कुपोषणास जबाबदार आहे .यामुळे मुला मुलींचे शिक्षणावर व पुढील आयुष्यातील आरोग्य शारीरिक व मानसिक विकासावर विपरीत परिणाम होतात.यामध्ये तीव्र प्रमाणात कृमीदोष असलेले विद्यार्थी लवकर आजारी पडतात तसेच त्यांना लवकर थकवा येतो व अभ्यासाकडे लक्ष केंद्रित होत नाही त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होते, यासाठी उपचार म्हणून लहान मुलांसाठी सुरक्षित जंत नाशकाची गोळी आहे ती वर्षातून दोन वेळा घेतले पाहिजे,असे डॉ.कोटी यांनी सांगितले. यावेळी अक्कलकोट शहरातील पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.