---Advertisement---

कार आणि ट्रकचा भीषण अपघात : सोलापूर जिल्ह्यातील नवविवाहितेसह तिघांचा मृत्यू !

By team
On: February 14, 2024 9:17 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

भरधाव कार आणि ट्रकच्या झालेल्या भीषण अपघातात कारमधील नवविवाहितेसह तिघांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात पुणे-सोलापूर 1 महामार्गावर भिगवणनजीक स्वामी चिंचोली (ता. दौंड) गावाच्या हद्दीत मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडला. या घटनेत दोन जण गंभीर जखमी आहेत.
राधिका अजय मस्के (२२), राजू बाबूराव मस्के (५२, रा. अबिकानगर, चिंचवड, पुणे), बाबासाहेब दत्तात्रय धेंडे (४८, रा. ज्योतिबावाडी, ता. बार्शी, जि. सोलापूर) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. चालक अजय राजू मस्के व त्यांची बहीण काजल राजू मस्के हे गंभीर जखमी झाले आहेत.

मस्के कुटुंबीय हे पुण्याहून उस्मानाबाद येथे कामानिमित्त निघाले असता, हा अपघात झाला. यामध्ये नवविवाहिता राधिका मस्के हिचा मृत्यू झाला. यातील जखमी अजय व मृत राधिका यांचा विवाह जानेवारीत झाला होता. रावणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे बाजूकडून सोलापूर बाजकडे जाणारी सेलेरियो कार ही ओव्हरटेक करताना पुढे चाललेल्या ट्रकला पाठीमागून उजव्या बाजूस धडकली. यात कारमधील चालकाशेजारी बसलेली त्याची पत्नी राधिका आणि पाठीमागे बसलेले चालकाचे वडील राजू मस्के दोघे जागीच ठार झाले. तर, उपचारादरम्यान बाबासाहेब धेंडे यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी रावणगाव पोलीस चौकीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची माहिती मिळताच भिगवण येथील आपुलकीची सेवा रुग्णवाहिकेचे चेतन वाघ यांनी धाव घेत रुग्णवाहिकेतून जखमींना रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी रावणगाव पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी, पोलीस हवालदार नवनाथ भागवत, गोरख मलगुंडे तसेच महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस फौजदार वसंत कदम, संतोष काळे, पोलीस हवालदार उमेश लोणकर, पोलीस नाईक नितीन वाघ हे घटनास्थळी दाखल झाले होते. जखमी व मृत व्यक्तींना त्यांनी बाहेर काढले. पुढील तपास रावणगाव पोलीस करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!