सोलापूर: राज्यात कोरोनाचा कहर पुन्हा वाढला आहे. मागील आठवड्याभरापासून राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली असल्याने चिंतेत भर पडली आहे. दरम्यान राज्यातील शाळा, धार्मिक स्थळे पुन्हा बंद करण्याची स्थिती आहे. पंढरपूर येथे मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झाले असून आता कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भाविकांना परत जाण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. भाविकांनी परत जावे अन्यथा गुन्हा दाखल करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने भाविकांना दर्शनाची परवानगी देण्यात आली होती. मात्र पुन्हा रूग्ण वाढू लागल्याने गर्दी होऊ नये यासाठी भाविकांना परत जाण्याचे सांगितले जात आहे. सोलापूर जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा विचार नाही मात्र खबरदारी घ्यावी असे आवाहन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे. रुग्ण संख्या वाढल्यास लॉकडाऊन करावे लागेल असेही त्यांनी सांगितले होते.
Breaking
- अवकाळी गारपीट आणि वादळी पावसाने राज्यातील शेतकरी चिंतेत !
- गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मुख्यमंत्री फडणवीस यांचा महत्वाचा संकल्प !
- ‘कॅप्टन’ अशोक खरात प्रकरणी राज्य सरकारने मोठा निर्णय
- बारामती पोटनिवडणुकीत संभ्रम; ‘पवार गट लढला नाही तर आम्ही मैदानात’ ; काँग्रेसचा इशारा !
- महाराष्ट्रात ऑपरेशन टायगरची चर्चा का? ठाकरेंना पुन्हा धक्का देणार शिंदे?
- गुढीपाडव्याचा जल्लोष राज्यभर; शोभायात्रा, ढोल-ताशा आणि भगव्या रंगात महाराष्ट्र रंगला !
---Advertisement---






