ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पवार व शिंदे एकटेच पडणार ; आ.रोहित पवारांचा दावा

मुंबई : वृत्तसंस्था

देशातील आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच राज्याचे राजकारण तापले आहे. तर कॉंग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्याने आणखी दिग्गज नेते पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरु असतांना नुकतेच शरद पवार गटाचे आ.रोहित पवारांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.

आ.रोहित पवार म्हणाले कि, येणाऱ्या काळात अजित पवार कदाचीत एकटेच पडतील. त्यांच्यासोबत असणारे जे नेते आहेत, ते त्यांच्यासोबत राहतील काही नाही, हा प्रश्न आहे. अजित पवारांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचीही स्थिती होईल. भाजप नेहमीच मित्रपक्षाला संपवते असा दावा त्यांनी केला आहे.
पुढे बोलताना म्हणाले की, अजित पवार आणि त्यांच्यासोबतचे आमदार हे त्यांच्यावर होणाऱ्या कारवाया थांबाव्यात, म्हणून भाजपसोबत गेले आहेत. हे भाजपला चांगले माहिती आहे, त्यामुळे हळूहळू भाजप त्यांना दबावातच ठेवेल. विधानसभा निवडणुकीत तर दहा-20 जागाच देतील. 2024 मध्ये हे पक्ष राहतील का? हा सर्वसामान्यांना प्रश्न पडलाय. काही आमदारांना धमकी देत घेऊन गेले आहेत, येणाऱ्या काळात हे आमदार आमच्यासोबत येतील, असा अंदाजही त्यांनी वर्तवला. कर्जतमधील महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यत समारोप भाषणात रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

रोहित पवार म्हणाले की, लोकशाही राहिली बाजूला आणि आता हे म्हणत आहेत की राष्ट्रवादी शरद पवार गटाला काहीच मिळाले नाही पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे. पण आम्ही लढू आणि लवकर आम्हाला चिन्ह देखील मिळेल आम्ही निवडणूक आयोगाकडे एकच चिन्ह देणार आहोत आणि ते आम्हाला मिळेलच कारण ते चिन्ह याआधी कोणत्याही पक्षाने वापरलेले नाही. पुढील 7 दिवसांत निवडणूक आयोगाकडून आम्हाला चिन्ह मिळेल. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आम्ही त्याच चिन्हावर आणि पक्षाच्या नावावर लढू.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!