---Advertisement---

परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थिनीने संपविले आयुष्य

By team
On: February 21, 2024 2:57 PM
Follow Us:
---Advertisement---

चंद्रपूर : वृत्तसंस्था

राज्यात आजपासून बारावीच्या परीक्षांना सर्वत्र सुरूवात झाली असून परीक्षेचा पहिल्याच दिवशी एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. चंद्रपुरात बारावीच्या विद्यार्थिनीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, चंद्रपूर शहरातील सुमित्रनगर भागात घडलीये.अनिशा खरतड (19) असे विद्यार्थिनीचे नाव आहे. आजोबांच्या मालकीच्या रिकाम्या फ्लॅटवर अनिशा नियमितपणे अभ्यासासाठी जात होती. काल देखील ती येथे गेली मात्र बराचवेळ झाला तरी ती घरी परतली नाही. त्यामुळे तिच्या आईबाबांची काळजी वाढू लागली. अनिशा परत न आल्याने आईवडिलांनी फ्लॅटवर चक्कर मारली. त्यावेळी समोर दिसलेलं दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

अनिशाने पंख्याला गळफास घेतला होता. त्याच अवस्थेत तिला पाहून आई-वडिलांवर दुख्खाचा डोंगर कोसळला. आईच्या किंकाळ्या ऐकून आजूबाजूच्या सर्व व्यक्ती तेथे धावून आले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. पोलीस तपासात मयत विद्यार्थिनीच्या नोटबुकवर सॉरी असे लिहिलेले आढळले आहे. पोलिसांनी विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांची चौकशी केली. त्यावेळी ती अभ्यासात हुशार होती, असं कुटुंबीयांनी सांगितलं. मात्र तिच्यावर परिक्षेचा भरपूर तान होता. चांगले गुण मिळवण्यासाठी ती मेहनत करत होती. मात्र परीक्षेच्या तणावात होती. या तणावामुळेच विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!