पुणे : वृत्तसंस्था
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार यांचा गट आणि अजित पवार यांचा गट असे दोन गट तयार झाले. यानंतर इतिहासात पहिल्यांदाच बारामतीत पवार विरूद्ध पवार असा सामना लोकसभा निवडणुकीत रंगल्याचा पाहायला मिळाला. त्यामुळे राज्यातील बारामती लोकसभा मतदारसंघाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सुनेत्रा पवार पिछाडीवर तर शरद पवार गटाच्या राष्ट्रवाजदीचे उमेदवार सुप्रिया सुळे या आघाडीवर असल्याचे समोर आले होते. दरम्यान आज बारामती लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू असतानादेखील सुप्रिया सुळे या आघाडीवर असल्याचे दिसतंय तर सुनेत्रा पवार या पिछाडीवर आहेत. सध्या आलेल्या अपडेटनुसार, सुप्रिया सुळे या ६ हजार ९४१ मतांनी आघाडीवर आहेत.