ध्यास विश्वसार्ह बातमीचा

”त्या” शपथविधीमागे पवारांची खेळी ; राष्ट्रपती राजवट उठवण्याशिवाय नव्हता दुसरा पर्याय – जयंत पाटील

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केलेल्या एक विधानामुळे राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काल एका वृत्तवाहिनीशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार हे दोघे २३ नोव्हेंबर २०१९ रोजी एकत्र येत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. मात्र हे सरकार फार काळ टिकू शकला नाही. या पहाटेचा शपथविधीमागे पवारांची खेळी असू शकते, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केले आहे.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, मला वाटत नाही की अजित पवार भुलले असतील. त्यावेळी राष्ट्रपती राजवट होती. राष्ट्रपती राजवट उठवण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. त्या अनुषंगाने केलेली एखादी खेळी असू शकते. अजित पवारांनी त्यावेळी जी विधाने केली त्याला फार महत्त्व आहे, असे मला वाटत नाही.

२३० नोव्हेंबर २०१९ साली महाराष्ट्रात सत्ता संघर्ष सुरु होता. त्यावेळी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापनेचा दावा केला. गडबड होऊ नये म्हणू या फडणवीस आणि अजित पवारांनी भल्या पहाटे राजभवानावर जाऊन राज्यपाल भगतसिंह जोशियारीकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. मात्र हे सरकार अल्पावधीतच कोसळला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!