---Advertisement---

महाविकास आघाडीत सामील होण्यासंदर्भात काय म्हणाले प्रकाश आंबेडकर वाचा सविस्तर

Follow Us:
---Advertisement---

पुणे : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीत सामील होण्याबाबत मोठे वक्तव्य केल्याने राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

बुधवारी पुणे दौऱ्यावर असलेल्या प्रकाश आंबेडकरांनी माध्यमांशी बोलताना महाविकास आघाडीबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली. आंबेडकर म्हणाले की, आगामी निवडणुकीत शिवसेना आणि वंचित एकत्र लढले आणि बाकी एकत्र नाही आले तरी आम्ही सरकार बनवू शकतो. महाविकास आघाडीचा भाग होण्याची आमची मुळीच इच्छा नाही. आमची युती शिवसेनेशी (ठाकरे गट) आहे. जागा वाटपावरून आमच्यामध्ये उद्धव ठाकरेंशी चर्चा झाली आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटासोबतयुती केली. त्यानंतर आज त्यांनी हे विधान केल्याने आगामी निवडणुकीत भीमशक्ती आणि शिवशक्ती महाविकास आघाडीचा भाग असणार की नाही, अशी नवी चर्चा सुरू झाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!